संगमनेरात घरफोडी

संगमनेरात घरफोडी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी घरातील सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना संगमनेर पंचायत समितीच्या आवारात बुधवारी घडली.

संगमनेर पंचायत समितीच्या आवारात असलेल्या बाभळेश्वर बिल्डींगमध्ये राहत असलेल्या मधुकर रामचंद्र देवकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बाळेश्वर बिल्डींग व निझर्णेश्वर बिल्डींग मध्ये प्रवेश करत दरवाजांचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, वंदना विक्रम नवले यांच्या घरातील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे 27 हजार 500 रुपये किमतीचे, व एक लेडीज घड्याळ असा एकूण 47 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत मधुकर देवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 749/2022 भारतीय दंड संहिता 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महाजन करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com