संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

वैद्यकीय अभ्यासक्रमाची (Medical Courses) पदवी न घेता तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता बेकादेशीरपणे रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना (Medical Treatment of Patients Illegally) आढळल्याने पोलिसांनी शहरातील बागवानपुरा येथील जावेद आयुब शेख या बोगस डॉक्टर (Bogus Doctor) विरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
शालेय विद्यार्थी गणवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांची घोषणा ठरली फसवी?

संगमनेर (Sangamner) तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी बोगस डॉक्टर कार्यरत आहे. यापूर्वी अशा बोगस डॉक्टर (Bogus Doctor) विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहेे. शहरातील बागवानपुरा परिसरातील रहिवासी जावेद शेख हा अशाच पद्धतीने बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय (Illegal Medical Practice) करत होता. दिनांक 10 एप्रिल 2023 पासून त्याचा हा उद्योग सुरू होता. त्याच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासन खडबडून जागे झाले.

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळते याचा आनंद - आ. थोरात

जावेद शेख हा संगमनेर (Sangamner) शहरात खुलेआम बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय (Illegal Medical Practice) करत होता. त्याने मागील वर्षी एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्याची पदवी ही बोगस असल्याची बाब एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आली. यानंतर त्याने ही बाब संगमनेर नगरपालिकेचे (Sangamner Municipality) मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणुन दिली. बोगस डॉक्टर शोध समितीचे नगरपालिका कार्यक्षेत्रात अध्यक्ष हे मुख्याधिकारी असतात.

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहर पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’

त्यामुळे, त्यांनी नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांना लक्ष घालायला सांगितले. त्यानुसार नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांनी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली व कागदपत्रे ताब्यात घेतले. कागदपत्रांची तपासणी केली असता त्याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
दंडकारण्य अभियानामुळे वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली - आ. थोरात

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा सर्जेराव कचकुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी. जावेद आयुद शेख (रा. नवरंग कॉप्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) या बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 422/2023 महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधि- 1961 अधिनियम चे कलम 3 व 36 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले हे करत आहे.

संगमनेरात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
कापडबाजारातील दुकानातून सहा तलवारी जप्त
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com