संगमनेर : दूध दरवाढीसाठी भाजपाचे आंदोलन
सार्वमत

संगमनेर : दूध दरवाढीसाठी भाजपाचे आंदोलन

उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

युती सरकारने नाईलाजाने दूध उत्‍पादकांना ५ रुपयांचे अनुदान दिल्‍याचे सांगितले जात असेल तर महाविकास आघाडी सरकारने ईलाज म्‍हणून का होईना १० रुपयांचे अनुदान देवून दाखवावे. राज्‍यातील दूध संघ हे कॉंग्रेस राष्‍ट्रवादीच्‍या ताब्‍यात असल्‍यामुळेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने कोल्‍हार घोटी मार्गावर दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आंदेलन करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्‍यक्ष डॉ.अशोक इथापे, जनसेवा मंडळाचे अध्‍यक्ष भास्करराव दिघे, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भूसाळ, डॉ.सोमनाथ कानवडे, रासपचे नेते नामदेव काशिद, जि.प सदस्या अॅड. रोहीणी निघुते, राजेश चौधरी, डॉ.विखे पाटील कृषि परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्‍यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगीराजसिंग परदेशी, परिमल देशपांडे, श्रीराम डेरे, वैभव लांडगे, विठ्ठलराव शिंदे आदि सहभागी झाले होते. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार अमोल निकम यांना देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com