Video : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कडकडीत बंद

शेतकऱ्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; सत्यजीत तांबे यांची मागणी
Video : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कडकडीत बंद

संगमनेर ( प्रतिनिधी )

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

दरम्यान, संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व आ डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय गवई गट, छात्रभारती, पुरोगामी व इतर मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संगमनेर शहर व तालुक्यातील १७१ गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

लखीमपुर खिरी येथील ४ शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले ही घटना अत्यंत निंदनीय असून न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना लोकशाहीमध्ये चिरडल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. यावेळी संगमनेर बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, राष्ट्रवादीचे कपिल पवार, प्रशांत वामन, निखिल पापडेजा, सुभाष सांगळे ,शेखर सोसे, गौरव डोंगरे, नितीन अभंग, हैदर अली, अंबादास आडेप, डॉ.अभय सिंह जोंधळे, यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व मित्र पक्षांचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com