दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर

दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

दोन मोटारसायकलची समोरुन येणार्‍या दुधाच्या टँकरला (Milk Tanker) धडक बसल्याने झालेल्या भिषण अपघातात (Accident) तीन जण ठार (Death) तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास संगमनेर-अकोले रस्त्यावर (Sangamner Akole Road) बर्फ कारखान्याजवळ घडली.

दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर
डॉ. अजित नवले यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध ?

याबाबत संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,  संगमनेरातून चिखलीच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेले चौघे तरुण दोन मोटरसायकल वरुन गप्पा मारीत जात होते. यावेळी मंगळापूर (Manglapur) शिवारातील बर्फ कारखान्याजवळ अकोल्याकडून आलेल्या दुधाच्या टँकरला दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला तर, एकजण अत्यवस्थ झाला.

दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर
गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू

या वाहनांच्या धडकेने झालेला प्रचंड आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी संगमनेर शहर पोलिसांनाही माहिती दिल्याने शहर पोलिसांचे पथक (Police) तत्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिक व पोलिसांनी चौघाही तरुणांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. तर एकजण अत्यावस्थ असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर
सौर कृषी वाहिनी योजनेत जिल्ह्यातील पहिला प्रकल्प राहात्यात

या अपघातात (Accident) मयत झालेले तिघेही तरुण संगमनेर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली (Chikhali) गावचे रहिवासी आहेत. मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) व निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही या. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) असे असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या भीषण अपघातात (Accident) एकाच वेळी तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने चिखलीच्या पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जखमी असलेल्या तरुणावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून मयत झालेल्या तिघाही तरुणांचे मृतदेह पालिकेच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून दुध टँकरच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com