निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार

प्रादेशिक योजना अंतिम टप्प्यात
निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार

तळेगाव दिघे | वार्ताहर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून साकारत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोणसह कर्हे, सोनेवाडी, पळसखेडे व पिंपळे या पाच गावांसाठी भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे होणाऱ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या गावांना पूर्ण दाबाने मुबलक पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार
COVID19 : जिल्ह्यात आज वाढले 'इतके' रुग्ण

निमोणसह पाच गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भोजापूर धरण परिसरात सुरु असलेल्या कामाची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली. प्रसंगी वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजि. बी. आर. चकोर उपस्थित होते. यावेळी इंद्रजित थोरात यांनी योजनेच्या कामाचा आढावा घेत तातडीने करावयाच्या कामांच्या सूचना दिल्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून भोजापूर धरणातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे निमोणसह पाच गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. कोरोनाकाळात नगर व नाशिक वनविभागाच्या विविध परवानग्या मिळवून व इतर तांत्रिक मंजुरी पूर्ण करीत सदर काम वेगाने सुरू आहे.

निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार
चंदन गॅंगला कोण लावतय चंदन?

प्रसंगी इंद्रजीत थोरात म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली १५ किलोमीटरची ही पाईपलाईन होत असून संगमनेर शहराप्रमाणेच निमोणसह पाच गावांना ग्रॅव्हिटीद्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीज बिल व इतर खर्च कमी होणार आहे. लवकरात लवकर पाचही गावांना पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळवून देत टँकर मुक्त करणे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. इंजि. बी. आर. चकोर म्हणाले, निमोण - तळेगाव भागाला वरदान ठरणाऱ्या भोजापूर चारीच्या दुरुस्तीचे कामही बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. निमोण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, त्यामुळे पाचही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com