उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...

१३२ के. व्ही. ते महात्मा फुले चौक रस्त्याची दयनीय अवस्था : ठेकेदारांना पोसणाऱ्या नगरपालिकेचे दुर्लक्ष
उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...

संगमनेर (प्रतिनिधी)

स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेरचा नारा देणाऱ्या नगरपालिकेचे १३२ के. व्ही ते महात्मा फुले चौक या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सुंदरतेचा आव आणणारी नगरपालिका रस्त्यावरील या झालेली अतिक्रमणे दूर करुन डांबरीकरण कधी करणार? असा सवाल स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

१३२ के. व्ही पासून ते साईश्रद्धा चौक. तिरंगा चौक ते पावबाकी रोड महात्मा फुले चौक पर्यंत ६० फुटी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तर अनेक बंद पडलेली वाहने रस्त्याच्या कडेला लावलेली असल्याने वाहनधारकांना ये जा करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. संगमनेर नगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहेत. मात्र ही झाडे लावताना रस्त्याचे कुठलेही मोजमाप न केल्याने 'उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

या झाडांची छाटणी वेळेवर होत नसल्याने बेसुमार वाढलेली ही झाडे त्रासदायक ठरत आहेत. त्यात घुलेवाडी ग्रामपंचायतीने पाईप लाईन व भुयारी गटारीचे उशिरा का होईना केलेल्या कामाने तर कहरच केला आहे. या रस्त्याच्या कडेने नेलेल्या भुयारी गटारीमुळे सिमेंटचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या चारीतील माती अद्यापही रस्त्यावर तशीच पडून आहे. ठेकेदाराने सिमेंट पाईप टाकल्यानंतर चारी बुजविल्या मात्र त्यावरील माती उचचली नसल्याने ती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य या रस्त्यावर आहे. २४ तास धुक्यासारखी परिस्थिती या रस्त्याची असल्याने सत्ताधारी केवळ ठेकेदारांना पोसण्याचे काम करतात की काय ? असाही सवाल उपस्थित होत आहे.

शासनाच्या पैशातून झालेल्या कामांवर कामांवर 'कांद्या' डल्ला मारला आणि घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचा 'गौरव' डोंगराएवढा झाला. मात्र केलेल्या कामाची कुणीही तपासणी केली नसल्याने रस्त्याने जाणाऱ्या अनेक समस्यांना येणाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. तिरंगा चौक ते महात्मा फुले चौक या दरम्यान घुलेवाडीच्या ठेकेदाराने केलेल्या कामातील त्रुटींचीही दखल नगरपालिकेने घेतली नाही. त्यामुळे या ठेकेदाराला जाब तरी कोण विचारणार? ग्रामपंचायतीचे सदस्य व नगरपालिकेचे नगरसेवक यांनीही एकमेकांकडे बोट दाखवत रस्त्याचे विद्रुपीकरण निमुटपणे पाहणे पसंत केले असल्याचे रस्त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते आहे.

उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...
COVID19 : काळजी घ्या! नगर जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद

उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...

'दिसली जागा की लावले झाड' या संगमनेर नगरपालिकेच्या आठमुठे धोरणामुळे १३२ के. व्ही. ते महात्मा फुले चौक हा ६० फुटी रस्ता झाडांच्या अतिक्रमणात तर धुळीच्या साम्राज्यात ओढला गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे ही विद्युत लाईनच्या खाली असल्याने सर्वसामान्य जनतेच्या जिवीतास धोकादायक ठरणार आहे. गटार आणि पाण्याच्या पिण्याच्या पाईपलाईनवर लावलेली ही झाडे येत्या काही दिवसांत धोकादायक ठरणार आहेत. रस्त्याचे मोजमाप न करता झाडे लावल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करण्यास मोठा वाव मिळाला आहे.

उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?
उदंड झाली झाडे... अरुंद झाले रस्ते...
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com