कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे मनसुबे उधळले - संदीप वर्पे

कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे मनसुबे उधळले - संदीप वर्पे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणार्‍या विकासकामांच्या निविदा पाशवी बहुमताच्या जोरावर नामंजूर केल्या होत्या.

त्या विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकारात कलम (308) अन्वये मंजूर करून कोपरगाव शहरवासीयांना न्याय दिला असून आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाना यश आले. विकासकामात खोडा घालण्याचे कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे मनसुबे उधळले गेले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विभागांच्या विकास कामांच्या निविदा मंजूर करण्याबाबतचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताचा चुकीचा उपयोग करून या विकासकामांचे ठराव नामंजूर केले होते.

त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांसह काँग्रेस, मनसे तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकारात कलम (308) अन्वये या विकासकामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कायदेशीरपणे विचार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या सर्व विकासकामांना मंजुरी दिली आहे.

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संदीप वर्पे बोलत होते. ते म्हणाले की, सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांना विनंती करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या नेत्याचा आदेश पाळण्यासाठी शहरविकासाला तिलांजली देत विकासकामात राजकारण करण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी सत्याची बाजू घेऊन कोपरगाव शहराच्या जनतेला अपेक्षित असणारा निकाल दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयामुळे कोल्हे गटाच्या नगरसेवकांना तोंडघशी पडावे लागले आहे.

कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर राजकारण करू नये, अन्यथा जनता येत्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा संदीप वर्पे यांनी यावेळी दिला.ही विकासकामे मंजुरीकामी अ‍ॅड. विद्यासागर शिंदे व अ‍ॅड. सुजय जगताप यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हाजीमहेमूद सय्यद यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक संदीप वर्पे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, डॉ. अजय गर्जे, धरमशेठ बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल,नगरसेविका सौ. सपना मोरे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा शिंगाडे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाघचौरे,अजिज शेख, रमेश गवळी,डॉ. तुषार गलांडे, निखिल डांगे, नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, आकाश डागा, सागर लकारे,संदीप कपिले, जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के, अंबादास वडांगळे,वाल्मिक लहिरे, धनंजय कहार,महेश उदावंत, ऋषिकेश खैरनार आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com