
कर्जत |प्रतिनिधी|Karjat
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकर्यांच्या शेतातील बांधावरील तीन चंदनाची झाडे तोडून चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी संजय बबन लाळगे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बहिरोबावाडी येथील गट नंबर 207 मध्ये लाळगे यांनी एक एकर क्षेत्रात 360 झाडे लावली आहेत. त्याच बांधावर चंदनाची 6 झाडे आहेत. मात्र मंगळवारी (दि. 21) सकाळी सहा वाजेच्या सुमारास बांधावरील एकच चंदनाचे झाड कापलेले व एक कापून नेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी 15 हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरून नेल्याची फिर्याद दिली.
बहिरोबावाडी गावातील सुनील मारुती यादव यांच्या शेतातील एक चंदनाचे झाड तसेच राहुल रामचंद्र शिंदे यांच्याही शेतातील चंदनाचे एक झाड कापून नेण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्याद दिल्यानंतर कर्जत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उद्धव दिंडे करत आहेत.