राहुरीच्या चंदन तस्करीत चक्क सरपंचच आरोपी

राहुरीच्या चंदन तस्करीत चक्क सरपंचच आरोपी

राहुरी |प्रतिनिधी| Rahata

राहुरी (Rahuri) येथे चंदन तस्करी (Sandalwood smuggling) करणार्‍या दोघाजणांच्या राहुरी पोलिसांनी (Rahuri Police) मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र, या चंदन तस्करीमध्ये (Sandalwood smuggling) आणखी दोघांची नावे समोर आली असून तो एका पक्षाचा सरपंच (Sarpanch) असल्याचे स्पष्ट झाले. आहे.

राहुरी (Rahuri) येथे चंदनाची तस्करी (Sandalwood smuggling) करणार्‍या दोघाजणांना राहुरी पोलीस (Rahuri Police) पथकाने सहा किलो चंदन (Sandalwood) व मोटारसायकल असा सुमारे 1 लाख 9 हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले होते. ही घटना राहुरी (Rahuri) तालुक्यातील वांबोरी (Vambori) परिसरात घडली होती.

दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान या घटनेतील आरोपी अमर पवार व विजय पवार हे राहुरी (Rahuri) तालुक्यातील वांबोरी (Vambori) परिसरात साखर कारखान्यापासून (Sugar Factory) कात्रडकडे जाणार आहेत, अशी खबर राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त खबर्‍याकडून मिळाली. त्यांनी ताबडतोब घटनेची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे (Police Inspector Rajendra Ingle) यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार दिनकर चव्हाण, संतोषकुमार राठोड, पोलीस नाईक आजिनाथ पालवे, रोहित पालवे आदी पोलीस पथकाने कात्रडकडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा लावला. काही वेळातच आरोपी अमर पवार व विजय पवार हे दोघे एका मोटरसायकलवर आले. पोलीस पथकाने ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे सहा किलो वजनाची चंदनाचे लाकडे (Sandalwood) आढळून आली. ती चंदन विक्री करण्यासाठी चालविली होती.

या कारवाईत पोलीस पथकाने 6 किलो 200 ग्रॅम वजनाचे 58 हजार 900 रुपये किमतीचे चंदन तसेच एक 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण 1 लाख 8 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी अमर नामदेव पवार (वय 30 वर्षे, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38 वर्षे, रा. एकलव्य वसाहत, राहुरी) या दोघांना गजाआड केले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली होती.

पोलीस तपासा दरम्यान या चंदन तस्करीमध्ये बाबासाहेब शिंदे (रा. कात्रड ता. राहुरी) तसेच राहुरी खुर्द येथील मल्हारी नामक तरूण या दोघांचा समावेश असल्याची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. या घटनेतील बाबासाहेब शिंदे हा कात्रड ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com