चंदनाची तस्करी करणारा अटकेत

चंदनाची तस्करी करणारा अटकेत

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत (Karjat) येथील प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील पथकाने चंदन तस्करी (Sandalwood smuggling) करणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे. कर्जतमध्ये नव्याने दाखल झालेले प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे. (Sandalwood smuggler arrested)

याबाबतची सविस्तर माहिती अशी, दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनच्या (Karjat Police Station) दुरध्वनीवरुन अधिकाऱ्यांना कर्जत (Karjat) येथे चंदनाची तस्करी झाली असल्याची गोपनिय माहिती मिळाली. वनपरीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची खात्री केली. पथकाला एक आरोपी चंदनाच्या मुद्देमालासह आढळून आला. त्यांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले.

या प्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात आली. चंदन तस्करी प्रकरणी आरोपी मोइनुद्दीन युसुफ शेख (रा. आंबेडकर गेटसमोर, कर्जत, वय ६९) याने अवैधरीत्या चंदनाची लाकडे बाळगल्याने व अवैध वाहतुक केल्याने भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम ४१,४२,५२,६५,६९ अन्वये व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ नियम ३१,५५ चे उल्लंघन झाल्याने वनपरीमंडळमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपीस २६ सप्टेंबर रोजी अटक केली.

२७ सप्टेंबर रोजी आरोपीस कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची वनकस्टडी दिली आहे. आरोपीस चंदनाचा पुरवठा कोणी केला व आरोपी सुवासिक चंदन कोणत्या कारखान्यांना देत याचा तपास सुरू आहे. उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वनपरीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले व वनकर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.