चंदन तस्कर जेरबंद; तिघे पसार

तोफखाना पोलिसांची कारवाई
चंदन तस्कर जेरबंद; तिघे पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतामधील 10 वर्षांचे चंदनाचे झाड चोरून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे. तिघे पसार झाले आहेत. नवनाथ ऊर्फ निवा मनोहर बर्डे (वय 28 रा. येडगाव ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या चंदन तस्कराचे नाव आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

सावेडी उपनगरातील शिवाजी कराळे यांच्या शेतामधून 10 वर्षांचे चंदनाचे झाड चौघांनी चोरून नेले होते. 18 नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी कराळे यांनी फिर्याद न दिल्याने सहाय्यक फौजदार गिरीष केदार यांनी फिर्याद दाखल केली होती. दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ बर्डे याच्यासह रवी मोरे (रा. नागापूर), साजन माळी (रा. संगमनेर चिखली), किरण शेकडे (रा. नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नवनाथ बर्डे याला अटक केली असून इतर तिघे पसार झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com