शेवगाव |वार्ताहर| Shevgav

भविष्यात वाळू उपशामुळे होणारश पर्यावरणाचा र्हास आणि संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन

नदीपात्रातील वाळू उपसा व वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ढोरजळगाव-ने ग्रामस्थांनी विरोध केला.

तालुक्यातील ढोरजळगाव-ने येथील ढोरानदीवरील वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ढोरजळगाव-ने ग्रामस्थांच्यावतीनेे तीव्र विरोध करण्यात आला आहे. वाळूचोरी करणार्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची असल्याने शासकीय यंत्रणेमार्फत बेकायदेशीर वाळू चोरी करणार्या विरुद्ध कारवाई करावी. शासकीय योजनेतील घरकुल बांधकामासाठी गावातील व्यक्तीला पाच ब्रास वाळू उचलण्यास परवानगी देण्याचा ठराव करण्यात आला.

ढोरजळगाव-ने ग्रामपंचायत कार्यालयात गाव पातळीवरीलच संगणक परिचालक नेमणूक करण्यास परवानगी देण्याचा ठरावही यावेळी संमत करण्यात आला. ढोरजळगाव-ने येथील ढोरा नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी जाहीर लिलाव करण्यात यावा. याकरिता महसूल विभागाच्यावतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ढोरजळगाव-नेच्या सरपंच गौरी उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेस मंडल अधिकारी रमेश सावंत, तलाठी प्रदीप मगर यांच्यासह माजी सरपंच गणेश कराड, अनंता उकिरडे, किशोर कराड, निलकंठ कराड, सुखदेव कराड, रविंद्र डाके, बाळासाहेब कराड, मधुकर कराड, नामदेव केकाण, ज्ञानेश्वर कराड, गोविंद उकिरडे, लहानू उकिरडे, प्रकाश घोरपडे, बाबासाहेब कर्डिले, रमेश माळी, अशोक माळी, देविदास माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी प्रास्ताविक केले. तसेच ग्रामसभेचे ठराव वाचन करून उपस्थितांचे आभार मानले.