वाळू चोरी; सोनई पोलिसांनी एक ब्रास वाळूसह टेम्पो पकडला

वाळू चोरी; सोनई पोलिसांनी एक ब्रास वाळूसह टेम्पो पकडला

सोनई |वार्ताहर| Sonai

विनापरवाना वाळू चोरून वाहतूक करत असलेला टेम्पो सोनई पोलिसांनी पानेगाव ते खेडलेपरमानंद रस्त्यावर पकडला असून याबाबत वाळूचोरीसह पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पानेगाव ते खेडले परमानंद रस्त्यावर टेम्पोमधून विनापरवाना वाळू चोरून वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सोनई पोलिसांनी रविवारी कारवाई केली. पोलीस नाईक विशाल थोरात यांनी याबाबत फिर्याद दिली.

गणेश साहेबराव शिंदे (वय 22) रा. खेडले परमानंद, ता. नेवासा हा विनापरवाना बेकायदा शासकीय मालकीची गौण खानिज वाळू पानेगाव ते खेडले परमानंद रस्त्यावरील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा खेडले परमानंद रस्त्यावर टेम्पोसह पकडला. 8 लाख 50 हजार रुपयांचा अशोक लेलंड कंपनीचा दोस्त प्लस मॉडेलचा छोटा टेम्पो (एमएच 17 बीवाय 8895) व 5 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू टेम्पोत आढळून आल्याने सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 409/2022 भारतीय दंड विधान कलम 379 पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार श्री. अकोलकर करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com