वाळूचा टेम्पो पकडला

file photo
file photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. देहरे (ता. नगर) टोलनाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

टेम्पो (एमएच 16 सीसी 4373) व एक ब्रास वाळू असा तीन लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. टेम्पो चालक अनिल गंगाराम वाघमारे (रा. नांदगाव) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई बंटी सातपुते यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com