नाणी नदी पात्रातून वाळू उपसा करणारे जेरबंद

जेसीबी, डंपरसह 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नाणी नदी पात्रातून वाळू उपसा करणारे जेरबंद

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

खरडगाव येथील नाणी नदी पात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळू वाहतूक करतांना जेसीपी डंपरसह दोघांना श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने जेरबंद करून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

तालुक्यात खरडगाव येथील नाणी नदीच्या पत्रातून बेकायदा, विनापरवाना पद्धतीने वाळूची उचलेगिरी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांना बातमीदारामार्फत  मिळाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी मिटके यांनी त्यांच्या पथकाला संबंधीत ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिले.त्यानुसार पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करतांना मिळून आलेल्या आरोपीच्या ताब्यातून 20 लाख रुपये किंमतीचा जेसीबी, तसेच दुसर्‍या आरोपीच्या ताब्यातून 6 लाख 15 हजार किंमतीचा डंपर व तीन ब्रास वाळू असा 26 लाख 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन काकडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशपाक सुलेमान शेख व गणेश चंद्रकांत केदार अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव परिसरात होत असलेल्या वाळूतस्करीबाबत बाहेरच्या पोलिस पथकाने येथे येऊन कारवाई केली. मात्र, स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, याबाबत परिसरातील पर्यावरणवादी यांच्याकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com