वाळू तस्करीविरुद्ध कर्जत पोलिसांची धडाकेबाज मोहीम

वाळू तस्करीविरुद्ध कर्जत पोलिसांची धडाकेबाज मोहीम

कर्जत |तालुका प्रतिनिधी|Karjat

अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर बुधवारी दुपारी कर्जत पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत 1 ट्रक जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. सलग दुसर्‍या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, एक ट्रक भांबोरा गावाच्या दिशेने अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून समजली.

गायकवाड यांनी तात्काळ पोलिसांच्या पथकाला माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळसीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, मनोज लातूरकर, काकडे, पोलीस नाईक नरोटे यांचे पथक त्याठिकाणी गेले.

त्यांना सिद्धटेक येथील पेट्रोलपंपाच्या पुढे टाटा एस कंपनीचा ट्रक अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तात्काळ एकास अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 379 व पर्यावरण संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सातपुते करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com