
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
हॅलो मी भैय्यू बोलतोय, आपल्याला वाळू (Sand) हवी आहे का? माझ्या वाळूतस्करांसोबत (Sand smuggler) ओळखी आहे. हवी तेवढी वाळू उपलब्ध करून देतो असे सांगून संगमनेर शहरातील (Sangamner) भैय्यू नामक व्यक्तीने अनेकांना वाळू (Sand) पुरविली. मात्र त्याने बांधकाम करणार्यांकडून वाळू (Sand) पोटी घेतलेली रक्कम वाळू तस्करांना (Sand smuggler) न देता स्वतःच हडप करत चक्क वाळू तस्करांनाच (Sand Smuggler) लाखो रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.
संगमनेर शहरात (Sangamner) गेल्या काही वर्षांपासून इमारतींच्या बांधकामाचे प्रमाण वाढलेले आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळूची गरज असते. संगमनेरातील (Sangamner) भैय्यू नामक इसमाने ही गरज ओळखून आपले हित साधून घेतले आहे. शहरात अनेकजण वाळू तस्करीचा व्यवसाय (Business of Sand Smuggling) करतात. वाळूसाठी ग्राहक शोधणे सुरुच असते. बांधकामासाठी वाळू हवी याबाबत कोणाचाही फोन आला तरी ते वाळू पुरवण्यास लगेच तयार होतात. याचा अंदाज आल्याने भैय्यू नामक व्यक्तीने शहरांमध्ये कोठे बांधकाम सुरू आहे याची पाहणी करण्यास सुरुवात केली.
वाळू हवी आहे का? अशी विचारणा तो बांधकाम करणार्यांकडे करायचा. वाळू हवी असे उत्तर आल्यास तो लगेच संबंधित वाळू तस्करांना (Sand Smuggler) फोन करायचा. त्याच्या मागणीनुसार वाळू तस्कर संबंधित ठिकाणावर वाळू पोहोच करायचे. भैय्यू संबंधित बांधकाम करणार्या कडून पैसे घ्यायचा मात्र घेतलेले पैसे संबंधित वाळू तस्करांना (Sand Smuggler) द्यायचाच नाही. अनेकदा त्याने वाळूसाठी जास्त पैसे आकारले तेही समोर आले आहे. अडीच हजार रुपयांच्या वाळूसाठी त्याने तीन हजार रुपये घेतले. मात्र संबंधित इसमांना ती रक्कम दिली नाही. काल एका वाळू तस्कराने (Sand Smuggler) खातरजमा केली. ज्या ठिकाणी वाळू पुरवली होती त्या ठिकाणी स्वतः गेला. आणि वस्तुस्थिती समजून घेतली. यानंतर वाळूतस्करांनी भैय्यू ने सुचवलेल्या व्यक्तीला वाळू देणे बंद केले आहे.
या भैय्यू नामक व्यक्तीने यापूर्वी ही वेगवेगळ्या करामती केल्या आहेत. पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांची चोरी ही त्याने केल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात (Sangamner City Police Station) गुन्हाही दाखल झाल्याचे समजते. चोरीचा गुन्हा दाखल होऊनही त्याचे कारनामे सुरुच आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.