
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील बहिरवाडी येथील बेकायदेशिर वाळू उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीसाठी लेखी दस्तावेजासह महसूल कर्मचार्यांशी संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पुराव्यार्थ सादर केल्या असल्याची माहिती तक्रारदार काकासाहेब गायके यांनी दिली.
बहिरवाडी येथील ग.नं.39 मध्ये बेकायदा वाळू उत्खननामुळे मूळ पंचनामा तहसील कार्यालयाने गायब केला व बनावट तयार केला व स्वत:चा आर्थिक फायदा केला असा आरोप करून याप्रकरणी दंड वसुली कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी यांचे दालनात सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने दिनांक 15 मार्च 2022 व दिनांक 03 जून 2022 रोजी ही सुनावणी घेण्यात आली होती. सर्व पुरावे,कागदपत्रे तात्काळ सादर करावेत, असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार श्री. गायके यांनी ऑडिओ क्लिप सादर केल्या.