वाळू उत्खनन पंचनामा गायब प्रकरणी चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश
सार्वमत

वाळू उत्खनन पंचनामा गायब प्रकरणी चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Arvind Arkhade

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननाचा मुळ पंचनामा गायब केल्या प्रकरणाची तक्रार तपासून उचित कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती काकासाहेब गायके यांनी दिली.

माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी दि.12 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचेकडे बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मुळ पंचनामा गायब करून नेवासा तहसील कार्यालयाने बनावट पंचनामा केला असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे आदेश दिले आहेत.

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मध्ये 1200 ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन झाल्याचा पंचनामा एक मंडळअधिकारी व चार तलाठी यांचे संयुक्त पथकाने केला होता. मात्र नंतर हा मूळ पंचनामा गायब करून केवळ 118 ब्रासचा बनावट पंचनामा तयार करून मुळ पंचनाम्याच्या सत्यप्रती नष्ट केल्याचा आरोप करुन महसूल विभागाचे नुकसान करणार्‍यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी काकासाहेब गायके यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचेकडे केली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com