गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा नदीतील वाळूसाठे; 29 नोव्हेंबरला पर्यावरण विषयक लोकसुनावणी

गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा नदीतील वाळूसाठे; 29 नोव्हेंबरला पर्यावरण विषयक लोकसुनावणी

अहमदनगर (प्रतिनिधी)

गोदावरी, प्रवरा, भीमा, सीना आणि मुळा नदीतील 122 वाळू गटांकरिता 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ उप-प्रादेशिक अहमदनगर कार्यालयाच्या वतीने पर्यावरण विषयक लोकसुनावणी घेण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर यासंदर्भात लेखी स्वरूपात विचार, टीका-टिप्पणी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला आहे.

नदीतील वाळू साठ्यांचे लिलाव होतात. पण मर्यादेपेक्षा नदी पात्रांमधील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणासह पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. अनेकदा वाळू तस्करीला ऊत येतो. त्यातून हाणामारीच्या घटनाही घटतात. मात्र रा चोरीची प्रशासनाला ना खेद न खंत. ठेकेदार आणि अधिकारी रातून गब्बर झाल्राची चर्चा आहे. राबाबत अनेकवेळा तक्रारी होतात. मात्र कारवाई काही होतांना दिसत नाहीर. या पार्श्‍वभूमीवर या जनसुनावणीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

या जनसुनावणीत नेवासा तालुक्यातील खुपटीतील प्रवरा नदी, अंमळनेरमधील मुळा नदतील वाळू गट, श्रीगोंद्यातील अननूज, अनगरे, काष्टी, सांगवीतील भीमा नदीपात्रातील वाळू गट, पारनेरातील करूंद येथील घोड नदी वाळू गट, शेवगावातील मुंगी, संगमेनरातील आश्‍वी, शिबलापूरातील प्रवरा नदी, नांदूर खंदरमाळ, जांबूत येथील मुळा, श्रीरामपूरातील वांगी खुर्द, उक्कलगाव, वळदगाव, एकलहरे, कडीत, पढेगाव, गळनिंब, फत्त्त्याबाद, मालुंजा, भेर्डापूर, कुरणपूर, मांडवे येथील प्रवरा नदीतील वाळू गट नायगाव, मातुलठाण, गोवर्धनपूर, खानापूर येथील गोदावरी नदी, राहुरीतील देसवंडी, रामपूर, वळण, डिग्रस, म्हैसगाव, चिखलठाण येथील मुळा नदीतील वाळूगट, बोधेगाव, धानोरे, चांदेगाव येथील प्रवरा नदीतील वाळूगट,बारागावनांदूर येथील मुळा नदी. कर्जत-जामखेडमधील भीमा, सीना नदीतील वाळूगट, राहात्यातील रस्तापूर, पुणतांबा येथील गोदावरी नदीतील वाळूगट, दुर्गापूर, पाथरे, हणमंगगाव, दाढ बुद्रुक, भगवतीपूर येथील प्रवरा नदीतील वाळूगट, कोपरगावातील वारी,डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, संवत्सर, चांदगव्हाण, मूर्शतपूर, धारणगाव, जेऊर पाटोदा, मंजूर, माहेगाव देशमुख, डाऊच, सांगवी भुसार, मायगाव देवी, मळेगाव थडी, सुरेगाव, कोळगाव थडी येथील मुळा नदीतील सुमारे 122 वाळू गटांचा समावेश आहे.

या प्रस्तावित वाळू गटांविषयी माहिती असलेले दस्तऐवज संबधित ग्रामपंचायत व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अभ्यासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबत लेखी स्वरूपात विचार, टीका-टिप्पणी करावयाची असल्यास 30 दिवसांच्या आत उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडय, सावेडी, अहमदनगर येथे पाठविण्याचे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com