घोगरगाव येथून वाळू उपशाची बंद यांत्रिक बोट जप्त

File Photo
File Photo

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा फाटा येथील कामगार तलाठी रामेश्वर गाडेकर यांनी घोगरगाव येथील जुन्या गावठाणधील महादेव मंदिरासमोरून वाळू उपसा करणारी बंद अवस्थेतील यांत्रिक बोट जप्त केली. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिलेल्या माहितीवरून तलाठी गाडेकर यांनी ही कारवाई केली.

त्यांनी लोखंडी यांत्रिक बोटीसह यांत्रिक इंजिन, लोखंडी पाईप, ड्रम असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने वाळू उत्खनन करण्याच्या उद्देशाने ही बोट ठेवली असल्याच्या संशयावरून ती ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी तलाठी गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com