समृद्धी महामार्गाच्या सिमेंटची बाहेर विक्री

एलसीबीकडून एकाला अटक
समृद्धी महामार्गाच्या सिमेंटची बाहेर विक्री

अहमदनगर|Ahmedagar

औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) पळशी (Palshi) येथील समृद्धी महामार्गाच्या (Samrudhi Highway) सिमेंट काँक्रीट प्लॅट सुपरवायझरला हाताशी धरून सिमेंटची बाहेर विक्री (sale of cement) करणार्‍या एकाला नगर एलसीबीच्या पथकाने अटक केली. गणेश अंबादास खेडकर (वय 32 रा. खुपटी ता. शिरूर जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुपरवायझर विक्रम देव सावंत विरूद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime at Chikhalthana police station) दाखल आहे. खेडकर याच्याकडून दोन लाख पाच हजार 521 रूपये किंमतीचे सिमेंट व टँकर (Tanker) असा मुद्देमाल जप्त करून चिखलठाणा पोलिसांच्या (Chikhalthana Police) ताब्यात देण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) अकोळनेर (Akolner) ते भोरवाडी (Bhorwadi) रस्त्यावर एक टँकर संशयितरित्या उभा असल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके (Police Inspector Anil Katke) यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला पाठवून सदर टँकर ताब्यात घेतला. यावेळी टँकरमध्ये कोणीच नव्हते. या टँकरच्या ड्रायव्हर विषयी चौकशी केल्यानंतर तो अकोळनेर गावात मिळून आला.

त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, समृद्धी महामार्गाच्या पळशी येथील सिमेंट काँक्रीट प्लॅट सुपरवायझरला हाताशी धरून सिमेंटची बाहेर विक्री करण्यात येत आहे. एलसीबीचे (LCB) सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार नानेकर, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, रवी सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com