समृध्दीच्या नागपूर-शिर्डी टप्पा उद्घाटनाचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार

कोपरगाव तालुक्यात समृध्दीचे काम प्रगतिपथावर
समृध्दीच्या नागपूर-शिर्डी टप्पा उद्घाटनाचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

अहमदनगर जिह्यातील (Ahmednagar District) कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) देर्डे-कोर्‍हाळे, (घारी, डाऊच बु., चांदेकसारे, जेऊरकुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे व धोत्रे या दहा गावांतून समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) जातो. तालुक्यातील समृध्दी महामार्गासाठी (Samrudhi Highway) 352 हेक्टर जमीन संपादीत झाली आहे. कोपरगाव-शिर्डी रस्त्याला (Kopargav-Shirdi Road) जोडणार्‍या रस्त्यापर्यंतचे काम वेगाने सुरू आहेत. नागपूर ते शिर्डी (Nagpur-Shirdi) पर्यंत हा रस्ता 1 मे 2021 पर्यंत सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न होता ते शक्य झाले नाही. नंतर 15 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याच्या हालचाली शासनाने केल्या. मात्र काम पूर्ण नसल्याने 15 ऑगस्टचा या रस्त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्तही हुकणार आहे.

जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून (Kopargav Taluka) जाणार्‍या समृद्धी महामार्गाची (Samrudhi Highway) एकूण लांबी 30 किलोमीटर आहे. त्यापैकी 2.5 किलोमीटर अंतर हे पुलांचे आहे. सध्या 18 किलोमीटरचे मातीचा भरावाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 9.5 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) 30 किलोमीटर दरम्यान लहान मोठे असे एकूण 137 पूल आहेत. त्यापैकी सर्वात मोठे दोन इंटरचेजेस आहेत. तसेच गोदावरीनदी, कोळनदी, खडकीनदी, मनमाड-दौंड रेल्वे मार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे-कोर्‍हाळे येथे दोन असे एकूण आठ मोठे उड्डाण पूल आहेत. तसेच दहा गावांतील महत्त्वाचे रहदारी असलेल्या स्थानिक रस्त्यांसाठी एकूण 27 लहान पूल आहेत. तर प्राण्यांसाठी, पाट, चार्‍या, शेतकर्‍यांसाठी, पाईपलाईनसाठी, 100 बोगदे असून सर्वाचे काम सुरू आहे.

साईबाबा देवस्थान (Sai Baba Trust) असलेल्या शिर्डीसाठी (Shirdi) नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) कोकमठाण शिवारात तीनचारी येथे सर्वात मोठे इंटरचेंजेस असून त्याच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. धोत्रे येथे छोट्या स्वरूपात इंटरचेंज असून त्याचे काम प्रगतीपथार आहे. धोत्रे येथील इंटरचेंज असून तेथून वाहने खाली उतरविता येणार आहेत ते काम अंतिम टप्प्यात आहे.

मागे 1 मे 2021 ला शिर्डीपर्यंत हा महामार्ग सुरू करण्याची घोषणा झाली होती मात्र ती घोषणा हवेतच विरली आहे. नंतर 15 ऑगस्टला शिर्डीपर्यंत महामार्ग सुरू करण्याची तयारी सरकारची होती मात्र काम पूर्ण नसल्याने आताही हा महामार्ग लगेच सुरू होण्याची चिन्हे नाहीत. कोपरगाव तालुक्यात काम सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. अजून बर्‍यापैकी काम बाकी आहे. अशाच वेगाने जर काम सुरू राहिले तर हे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्ष-दीड वर्ष लागू शकते.

मुबंई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा महागार्ग आहे. याचे जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे तर नागपूर-शिर्डी पर्यंतचे काम 90 टक्क्यांपर्यंत झालेले आहे. या कामावर जवळपास 34 हजार लोक काम करत आहेत. 55 हजार कोटींच्या या रस्त्यावर आतापर्यंत 35 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com