समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अडकला कंटेनर

नगर मनमाड महामार्ग जाम | भविष्यात जड वाहने पुलाखालून कशी जाणार ?
समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अडकला कंटेनर

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यात समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम जोरात चालू आहे. जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) कोकमठाण (Kokamthan) सर्कल परिसरात समृद्धी महामार्गाच्या पुलाला (Samrudhi Highway) शिर्डीहुन (Shirdi) मशीन घेऊन येणारा कंटेनर (Container) अडकला. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर पुलाचा काही भाग कापून कंटेनर (Container) बाजूला घेण्यात आला तोपर्यंत ट्रॅफिक (Traffic) पूर्ण जाम झाली होती. काम पूर्ण होण्याच्या आतच अशी परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यात जड वाहने (Heavy Container) पुलाखालून कसे जातील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) तीनचारी परिसरात सर्कलचे काम सुरू असल्याने नगर- मनमाडकडून (Nagar-Manmad Highway) जाणारी ट्रॅफिक समृद्धीच्या महामार्गाखाली (Samrudhi Highway) पूल तयार करून काढून देण्यात येणार आहे. पुलाचे काम चालू असलेल्या बाजूला दुसरा रस्ता करून वाहने मार्गस्थ केली जात होती. काल मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस असल्याने रात्री साडेसात वाजता शिर्डीहुन (Shirdi) येणारा कंटेनर (Container) चालकाच्या बाजूचा रस्ता लक्षात न आल्याने त्यांने काम चालू असलेल्या पुलाखालून आपली गाडी घातली. पुलाचा काही भाग ओलांडत असतानाच गाडी पुलाला अडकली.

परिसरात राहत असलेले देवा लोखंडे व अमोल भाकरे यांच्या हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी समृद्धीवर काम करणाऱ्या कामगारांना आवाज दिला. नगर मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) काही काळातच ट्राफिक (Traffic) जाम झाली. समृद्धीचे अधिकारी तेथे आल्यानंतर त्यांनी तातडीने पुलाचा काही भाग कटरच्या साह्याने कापत आत अडकलेला कंटेनर मागे घेतला. नंतर ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली. पूल पूर्ण होण्याच्या आतच जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यात पुलाखालून जड वाहन कसे जाणार असा प्रश्न अनेकांनी तेथे उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com