
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
वैजापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गावरील जांबरगाव टोलनाका येथे शनिवार दि. 8 रोजी पुन्हा कर्मचार्यांनी बंद केला, अन् कारण तेच कर्मचार्यांचे पेमेंट नाही.
समृध्दी महमार्गावर लोक वेळ वाचवण्यासाठी दांडगा टोल भरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या आगोदरही कर्मचार्यांनी अनेकदा पागरमुळे टोल नाका बंद केला आहे मात्र या बाबीकडे टोल कंपनीने वारंवार दुर्लक्ष केले यातच,अनेकदा अशा घटना घडूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील याबाबत कुठलाही कारवाई करण्यात आली नाहीये टोल वसुली करणार्या कंपनीचा हलगर्जी पणा मुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
तर घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि विजय नरवाडे, उपनिरीक्षक मनोज पाटील,रज्जाक शेख,अविनाश भास्कर,विशाल पडळकर,चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचार्यांची समजूत काढून तत्काळ टोल उघडुन कोंडी मोकळी केली.
अनेकदा अशी आंदोलने झाल्याामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नेहमी प्रवाशांच्या होणार्या हेळसांडीकडे दुर्लक्ष करून जबाबदारी कंपनीवर झटकते.
वारंवार होणार्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाने संबधित कंपनीच्या अधिकार्यांना सोमवारी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. यासोबतच कर्मचार्यांना देखील ठाण्यात बोलावून नेहमी उद्भवणार्या या परिस्थितीतून मार्ग काढून पूर्णविराम लावण्याचा येईल.
- विजय नरवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक