जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील

जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी करण्यात आले. नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.

जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील
पिक्चर अभी बाकी है !

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आ. सिमा हिरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील आदी उपस्थित होते.

जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील
परदेशात जावून यशस्वी उद्योजक झालेल्यांनी जिल्ह्यात उद्योग उभारावेत

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि प्रत्यक्ष कामाला त्यांच्या काळात सुरुवात झाली. त्यावेळी आपल्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विकास विभागाचे मंत्री होते. या उभयतांनी समृध्दी उभारणीसाठी कष्ट घेतले. विक्रमी अशा कमी वेळेत भूसंपादन केले. शेतकर्‍यांना बाजारभावापेक्षा पाचपट जास्त मोबदला देण्यात आला.

जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील
महाराष्ट्राला समृद्ध करणारा ‘समृद्धी’ महामार्ग - ना. विखे

मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा हा महामार्ग चार विभागांतील 10 जिल्ह्यांमधून जात असल्याने त्या भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. शेती विकासाला उपयुक्त ठरणार असून मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मधील शेतकरी आपला उत्पादित माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेवू शकणार आहेत. शेती - कृषी मालाची निर्यात होणार असल्याने औद्योगिकीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास ही महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग - महसूलमंत्री विखे पाटील
जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी निलंबित

खा. लोखंडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. समृद्धी महाराष्ट्राबरोबर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरणारा प्रकल्प आहे.

खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, समृध्दी महामार्गाला जोडूनच सुरत-हैद्राबाद हा ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. नगर-मनमाड महामार्गाचे काम जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला गतिशिल रस्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. त्यातून विकासाला चालना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com