समृद्धी महामार्गातील कामाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनाचे सारथ्य
समृद्धी महामार्गातील कामाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway) लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) पहिल्या टप्प्यातील 520 किलोमीटर पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची रविवारी पाहणी केली.

नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा (Samruddhi Highway) झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी 5 वाजता शिर्डी येथे पोहचला. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil), खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe), खा. सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. या दौर्‍यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी कोपरगाव इंटरचेंज येथे आ. बबनराव पाचपुते, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी 520 किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी 29.40 किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील 10 गावांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. कोपरगाव इंटरचेंजपासून शिर्डीचे अंतर 10 किलोमीटर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com