
वैजापुर |प्रतिनिधी| Vaijapur
समृध्दी महामार्गावर आज (गुरूवारी) सायंकाळच्या सुमारास निसान कंपनीच्या कारने अचानक पेट घेतला. यात सुर्देवाने कुठलीही जिवित हाणी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की, नागपुर मुंबई समृध्दी महामार्गावर बुलढाणा (साखरखेडा) येथील राजपुत कुंटूंब शिर्डी मार्गे पुण्याला जात असतांना वैजापुर शिवारातील गलांडे वस्ती जवळ त्यांच्या एम एच 14 ईव्ही 7939 या कारने अचानक पेट घेतला.
काही क्षणात कारला मोठ्या प्रमाणात आग लागली. प्रसंगावधान राखत कुंटूंब सुखरूप कारच्या बाहेर पडले. पुढील अनर्थ टळला. यावेळी अग्निशमन दलाला घटना कळताच लागलीच घटनास्थळच्या कारची आग विझवली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.