
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या महामार्गाचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे नुकताच संपन्न झाला. या लोकार्पण सोहळयानंतर या महामार्गाने पहिली प्रवासी बस सुरू करण्यात आली.
या पहिल्या प्रवासी बसला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे हिरवा झेंडा दाखवून नागपूरहून शिर्डीकडे रवाना करण्यात आली. या पहिल्या प्रवासी बसचे स्वागत नगर-मनमाड रोड कोकमठाण येथील समृध्दी महामार्गाच्या सर्कल येथे साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव तसेच संस्थांचे अधिकाऱी यांनी रविवारी रात्री साडेअकरा वाजता बसमधील सर्व प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बसमधील बसणार्या प्रवाशांनी प्रवास करण्याचा आनंद घेत या महामार्गावरील प्रवासाचा अनुभव सांगितला.