आरक्षणाच्या मुद्यावर 9 मेपासून गाव बंद आंदोलन - दहातोंडे

आरक्षणाच्या मुद्यावर 9 मेपासून गाव बंद आंदोलन - दहातोंडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती, मराठा महासंघाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राज्य सरकारने योग्य भूमिकांना न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा निषेधार्थ मराठा महासंघातर्फे 9 मे पासून जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.

त्यासाठी 8 मे रोजी नगर येथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, शेतकरी मराठा महासंघाच्या समन्वयकाची बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली.

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण रद्द झाल्याने समाजामध्ये तीव्र संतापाची भावना झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मराठा समाजाच्या कुटुंबातील अनेक तरुणांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मराठा समाज मागास कसा आहे हे, प्रभावीपणे न मांडल्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. भाजप सरकार असताना मराठा आरक्षण दिले.

परंतु या सरकारने ते टिकवले नाही. मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार नेमकं काय करणार? राज्य सरकार नेमकी काय भूमिका काय असेल हे शासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी करत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत 9 मेपासून शेतकरी मराठा महासंघ मराठा समितीतर्फे गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तर आठ मे रोजी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक होणार होणार असल्याचे दहातोंडे यांनी कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com