शिर्डी विकास आघाडीकडून भिडेच्या फोटोला ‘जोडो मारो’ आंदोलन

संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
शिर्डी विकास आघाडीकडून भिडेच्या फोटोला ‘जोडो मारो’ आंदोलन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

संभाजी भिडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व रासुका अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा व देशद्रोह, दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, राष्ट्रीय महापुरुष व संत यांच्या विषयी अपशब्द वापरणे व शिवराळ भाषेचा उपयोग करणे या मागणीसह शिर्डीत शिर्डी विकास आघाडीच्यावतीने शिर्डी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत शिर्डी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, संभाजी भिडे हा इसम वारंवार देशाची, राष्ट्रीय ध्वजाची, महापुरुषांची व राष्ट्रीय संतांची तसेच महिलांची अवहेलना व बेताल वक्तव्य करून दोन समाजांत व धर्मांत तेढ निर्माण करत आहे. यामुळे राज्यात व देशात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे. यामुळे भिडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व रासुका अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. देशद्रोह, दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, राष्ट्रीय महापुरुष व संत यांच्याविषयी अपशब्द वापरणे व शिवराळ भाषेचा उपयोग करणे तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करावी व सदर इसमास तातडीने अटक करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन चौगुले, सुरेश आरणे अ‍ॅड. अविनाश शेजवळ, अमृत गायके, कानीफ गुंजाळ, तुषार शेजवळ, समीर शेख, संतोष वाघमारे, राजमोहम्मद शेख, योहान गायकवाड, ज्ञानेश्वर हातांगळे, विजय पवार, विशाल बर्डे, शिवसेनेचे सचिन कोते, शहराध्यक्ष संजय शिंदे, सुनील परदेशी, दत्तू असणे, अमोल गायके, सुयोग सावकारे, विश्वजीत बागुल, पुंडलिक बावके, महिला तालुका अध्यक्ष दीपाली पवार, मनसेचे शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, प्रशांत वाकचौरे, आंबादास कांबळे, नानासाहेब काटकर, रमेश बनकर, वैभव सोनवणे, प्रवीण बनकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, प्रवीण आल्हाट, किरण बोर्‍हाडे, बाळासाहेब गायकवाड, किरण कदम, साई दिवे, संदेश मोरे, आतिष शेजवळ, प्रहारचे तालुका अध्यक्ष विजय काकडे, अमोल बानाईत, बाबासाहेब दिवे, विकी मिसाळ, भारतीय लहुजी सेनेचे समीर वीर, शिवाजी भोंडगे, शिवा उमाप, गणेश अहिरे, योगेश कांबळे, रोहित वीर, शाहरुख शेख, रुपेश आरणे, संजय भोंडगे, बद्रीनाथ लोखंडे, गिरीश सोनेजी आदींसह साईभक्त, काँग्रेस, शिवसेना, मनसे ,प्रहार जनशक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय लहुजी सेना, राष्ट्रीय तेली महासंघ यासह विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या.

राज्यात बेरोजगारी, महागाई, कृषी विभागाचा गैरव्यवहार, तलाठी भरतीतला गैरव्यवहार यावर विरोधी पक्षाने सरकारला घेरलं आहे. आ. बाळासाहेब थोरात यांनी सरकारची प्रचंड कोंडी केली आहे. धगधगणार्‍या मणिपूरचा विषय विधानसभेत तांडव करत आहे. सरकारच्या नाकी नऊ आले आहे. या परिस्थितीतून पळ काढण्यासाठी विरोधकांचं आणि जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भिडेंचा वापर केला जात आहे. भिडेना भाजपा सरकार समर्थन देत आहे. त्यामुळेच गुन्हे दाखल होऊन सुद्धा अटक होत नाही.

सचिन चौगुले,अध्यक्ष शिर्डी काँग्रेस

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com