समाजवादी पार्टीचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरुच

समाजवादी पार्टीचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरुच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नागरीक करोना महामारीने त्रस्त झालेले असतानाच शहरातील अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई आणि साथीच्या आजाराची साथ फैलाऊ शकतो, त्यामुळे स्वच्छतेचा दिलेला ठेका रद्द करावा, या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. नगरपालिका प्रशासन कोणतीच ठोस भुमिका घेण्यासाठी पुढे धजावले नसल्याने उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरुच होते.

श्रीरामपूर नगरपालिकेने घनकचर्‍याचा ठेका दिला असून ठेकेदारास दर महिन्याला तब्बल 30 लाख रुपये मोजले जातात. मात्र शहरातील अस्वच्छता जशीच्या तशीच आहे, इतकी मोठी रक्कम मोजूनही फायदा होत नसेल तर नगरपालिकेने हा ठेका रद्द करुन इतर दुसर्‍यास द्यावा, जेणे करुन शहरातील स्वच्छतेने नागरिकांचे आरोग्य आबाधित राहील. या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सरु केले आहे. श्री. जमादार यांच्यासोबत आसिफ तांबोळी, अय्युब पठाण, ज़करिया सैय्यद, अरबाज़ कुरैशी, अमन शेख, साद पठाण, शाहिद शेख, फैज़ान काज़ी, तौफीक शेख, अतीक पठाण उपोषणास बसले आहेत.

शहरवासियांच्या आरोग्याप्रश्नी तथा संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासंबंधी नगरसेवक, नगराध्यक्षा आणि प्रशासन ठोस भुमिका घेण्यासाठी पुढे येत नाहीत, याचाच अर्थ शहरातील नागरिकांच्या आरोग्याप्रश्नी त्यांना काही घेणे-देणे नाही. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या नगरपालिका प्रशासन आणि संधीसाधू पदाधिकार्‍यांना येत्या पालिका निवडणुकीत जागरुक नागरीक त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे उपोषणकर्ते जोएफ जमादार यांनी सांगितले.

काल राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त उपोषणस्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, आ. लहू कनडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, कामगार नेते नागेश सावंत, केतन खोरे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय छल्लारे, मुन्ना पठाण, रितेश ऐडके, चरण त्रिभुवन, शिवा साठे, हनिफ पठाण, विठ्ठल गोराणे, फिरोज पठाण, फैय्याज बागवान, सागर दुपति, रवींद्र गुलाटी, नजीर पिंजारी, जाकीर शाह, रईस शेख यांनी उपोषणार्थींची भेट घेवून पाठिंबा दर्शविला.

Related Stories

No stories found.