प्राथमिक शिक्षकांच्या पगाराला उशीर

प्राथमिक शिक्षकांच्या पगाराला उशीर

आर्थिक गणित बिघडले : नाराजीचा सूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्ग काळात फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांना कामगिरी दिली असताना त्यांचे पगार मात्र दीड ते दोन महिने उशिरा होत आहेत. गेल्या वर्षभरापासून हा विलंब सुरू असल्याने शिक्षकांची आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर आवळण्यात येत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 573 शाळा असून तेथे 11 हजार 528 शिक्षक कार्यरत आहेत. सध्या या शिक्षकांना करोना ड्युटी दिलेले आहे. लसीकरण केंद्र तोरणा चाचणी, गावात करोनाचे संशयित लोकांचे सर्वेक्षण तसेच इतर धोरणासंबंधी कामात शिक्षकांना सध्या सेवा बजवावी लागत आहे, असे असतानाही शिक्षकांच्या पगाराचा पगाराला दीड ते दोन महिने विलंब होत आहे.

अजूनही काही शिक्षकांचा मार्च महिन्यांतील पगार झालेला नाही. यामुळे शिक्षकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अनेकांना बँकांच्या कर्जाचे हप्ते, गाडीचे हप्ते, हॉस्पिटलचा खर्च, तसेच इतर खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने फ्रन्टलाइन वर्कर गांधी कस विचारात घेऊन शिक्षकांचे पगार वेळेवर करावे अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

सध्या शाळा सुरू नसले तरी शिक्षक ऑनलाईन क्लास घेण्याचे काम करत आहेत आणि आता सुट्टी मध्ये कोरोना ची ड्युटी सांभाळत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर करावे अशी मागणी पुढे येत आहे.

75 ते 80 कोटींचे महिन्यांचे बजेट

जिल्ह्यात साडेअकरा हजार प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या एका महिन्यांच्या वेतनापोटी 75 ते 80 कोटी रुपयांची रक्कम लागते. करोना काळामुळे गेल्या वर्षभरापासून वित्त विभागाकडून हा निधी येण्यास उशीर होत असून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून ट्रेझरी बँक व बँकांतून शिक्षकांच्या खात्यात जाईपर्यंत ही विलंब लागतो. सध्या कर्मचार्‍यांचे पंधरा टक्के क्षमतेने काम सुरू आहे तसेच अनेक बँकांमध्ये कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्याचाही परिणाम पगार उशिरा होण्यावर होत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

वेळेवर पगार न होणे ही नेहमीचीच समस्याआहे. पगार वेळेवर न झाल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते. दूधवाला, किराणा, भाजीपाला, वीज बिल, फोन बिल, बँकेचे हप्ते, त्यातच अचानक आलेले कोविड-19 चे संकट किंवा आरोग्याच्या समस्या या सर्वांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच पगार वेळेवर होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने या गोष्टींचा विचार करून पगाराचे नियोजन करावे.

- सुनील पवळे, जि.प. शाळा सांगवी, ता. नेवासा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com