सलाबतपूर परिसर भुरट्या चोर्‍यांनी त्रस्त

जुनी तिथेच टाकून नव्या मोटारसायकलची केली चोरी
सलाबतपूर परिसर भुरट्या चोर्‍यांनी त्रस्त

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसर भुरट्या चोर्‍यांमुळे त्रस्त झाला असतानाच गिडेगाव रस्त्यावरील वस्तीवरून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाची नवी मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली. चोरटे त्यांच्याकडील जुनी मोटारसायकल तिथेच ठेवून नवी मोटारसायकल घेऊन निघून गेले.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात जनावरे, शेळ्या, कापूस, सोयाबीन अशा प्रकारच्या भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ झालेली आहे. या चोर्‍यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. येथील सलाबतपूर शिवारात गिडेगाव रोडवरील वस्तीवरून एका तरुणाची होंडा कंपनीची नवी गाडी चोरट्यांनी चोरून नेली.

तर चोरीची घटना घडलेल्या वस्तीच्या बाजूलाच एक बेवारस मोटारसायकल आढळून आली आहे. त्यामुळे आज्ञात चोरट्यांनी नवी गाडी नेताना जुनी गाडी तेथेच सोडून गेल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. या भुरट्या चोर्‍या करणारांचा बंदोबस्त कधी करणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com