साकुरीत महिलांनी अडविला कचर्‍याचा ट्रॅक्टर

साकुरीत महिलांनी अडविला कचर्‍याचा ट्रॅक्टर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

साकुरी येथील दत्तनगर भागात 15 दिवसापासून कचरा गोळा करणारा ट्रॅक्टर आला नाही. आल्यानंतर या महिलांनी संतप्त होत कचर्‍याचा ट्रॅक्टर अडविला.

महिलांनी कचरा भरलेल्या बॅगा ट्रॅक्टर समोर आडव्या ठेवत ट्रॅक्टर अडवून धरला. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर जावू देणार नाही, असे म्हणून त्या अडून बसल्या. या भागातील पाणीपट्टी, घरपट्टी यांची 100 टक्के वसुली होत असूनही सुविधेपासून दुर्लक्ष केले जाते. 15-15 दिवस कचरा उचलणारा ट्रॅक्टर येत नाही. परिणामी कचर्‍याची दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलेही आजारी पडतात. साकुरी ग्रामपंचायतीने या गोष्टीचा विचार करुन न्याय द्यावा, असा या महिलांचा सुर होता.

ओला कचरा व सुका कचर्‍यासाठी डस्टबीन द्यावेत, यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले. कचर्‍याचा वास सुटल्याने गाव स्वच्छ कसे राहणार, असा सवाल या महिलांनी केला. स्ट्रीट लाईट नाही, पण ग्रामपंचायतीचे कर भरले जातात. याप्रसंगी गीतांजली शिरकांडे, मनिषा आहेर, माधुरी बेंद्रे, मनिषा शिरकांडे, पुष्पा जोशी, संगीता बेंद्रे, संगीता सदफळ , निशा बोर्‍हाडे, वंदना बोर्‍हाडे, रुपाली गायकर, प्रियांका आसने, रिपाल पटेल, नूतन लोढा, धर्मिष्ठा पटेल, राधिका तुली, मंदा खरात, राधा भंडारी, फरीदा पठाण, नीता वाकचौरे, कविता शिंदे या महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com