साकुरीत झालेल्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

साकुरीत झालेल्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साकुरी येथील गोदावरी वसाहत जवळ अपघातात जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.

राहाता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 23/2023 यातील मयत एक अनोळखी (वय 40 वर्ष) अपघातात जखमी झाल्याने त्यास श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे औषध उपचार कामी दाखल केले होते. दरम्यान 27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटली नाही. नगर-मनमाड रोडवर साकुरी शिवारात गोदावरी वसाहत जवळ हा अपघात झाला.

या अपघातातील मयताच्या अंगात बंद गळ्याचा लाल रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. सदर मयत इसमा बाबत कोणास माहिती मिळाल्यास राहाता पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार तुपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com