साकूर येथील चितळकर वस्तीवर चोरांचा धुमाकूळ

चार बंद घरे फोडून तीन लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल गुंडाळला; एक मोटारसायकल चोरीला
साकूर येथील चितळकर वस्तीवर चोरांचा धुमाकूळ

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चितळकर वस्तीवर चार बंद घरे फोडून तीन लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल तर एक मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरांनी वीरभद्र विद्यालय जवळील चायनीज दुकानाजवळ लावलेली सचिन दिनकर सोनवणे यांची साधारण वीस हजार रुपये किमतीची मोटर सायकल क्रमांक एम एच 17 बी बी 5007 काळे रंगाची हिरो कंपनीची मोटर सायकल चोरीला गेली तर त्याच रात्री साकुर येथील चीतळकर वस्तीवरील चार बंद घरांचे कडी कोयंडा तोडत तीन लाख चौतिस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी गुंडाळून नेल्याची घटना घडली आहे.

पठार भागातील साकूर परिसरात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घालत चोरीचे सत्र चालूच असल्याचे समोर येत आहे.यात साकूर जवळील चीतळकर वस्तीवरील चार बंद घरे फोडत मोठ्या रक्कमेचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले आहेत. चितळकर वस्तीवरील रखमा भागा चितळकर, बापू भागा चितळकर, वच्छाबाई अंबु चितळकर, दत्तू भाऊ चितळकर या चौघांच्या बंद घराचे कुलूप, कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करत घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कमेसह असा तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे.

याप्रकरणी रखमा भागा चितळकर यांनी घारगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा रजिस्टर नंबर 253/2022 भा. द.वी.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सातपुते करत आहेत. तर हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी चोरी प्रकरणी सचिन दिनकर सोनवणे यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूध्द भा. द. वी.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जी.पी.लोंढे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com