
घारगाव |वार्ताहर| Ghargav
संगमनेर तालुक्यातील साकूरनजीक असलेल्या चितळकर वस्ती येथील कारभारी उर्फ दादू आंबू चितळकर (वय 47) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार (ता.29) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चितळकर वस्ती येथील कारभारी उर्फ दादू चितळकर यांनी शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हिवरगाव पठार गावच्या शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी बाळू चितळकर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ करत आहेत. दरम्यान कारभारी उर्फ दादू चितळकर यांनी आत्माहत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.