साकूर भागात दमदार पाऊस, बिरेवाडीत नाला फुटला

साकूर भागात दमदार पाऊस, बिरेवाडीत नाला फुटला

साकुर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात दमदार पाऊस झाल्याने नाले पाझर तलाव भरून वाहू लागले आहे. सोमवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने साकूर जवळील बिरेवाडी येथे नान्नर वस्ती जवळील नाला फुटल्याने डांगर ओढ्याला प्रचंड पाणी आले होते. साकूर-बिरेवाडी हा रस्ता फासाटे वस्ती जवळील पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती.

तर काळाबाई ओढ्याला पूर आल्याने रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. बिरेवाडी गावठाणमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पुराच्या पाण्यातून शाळा सुटल्यावर नागरिक व शिक्षकांनी सुखरूप बाहेर काढून घरी जाण्यासाठी पालकांना फोन करून बोलावून घेत पाल्यांना पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान परिसरात दमदार पाऊस झाल्याने बिरेवाडी, मांडवे, शिंदोडी, कौठेमलकापूर, हिवरगावपठार, शेंडेवाडी, जांबूत, जांभूळवाडी, चिंचेवाडी, हिरेवाडी आदी ठिकाणी तळे नाले भरल्याने ओढे वाहू लागले आहे.

सोमवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने आनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे मात्र यात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com