साकूरमध्ये माकडाची दहशत, अनेकांना घेतला चावा

साकूरमध्ये माकडाची दहशत, अनेकांना घेतला चावा

साकूर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे पाच सहा दिवसांपूर्वी एका माकडाने बालके व ग्रामस्थांना जखमी केले होते. त्यानंतर त्याच माकडाने साकूरमध्ये धुमाकूळ घालत ग्रामस्थांना जखमी केले आहे. माकडाच्या दहशतीने साकूर परिसरात घबराट पसरली आहे. वन विभागाने तातडीने या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या 10 ते 15 दिवसांपासून एक माकड साकूर परिसरात वास्तव्य करीत आहे. परंतु ते माकड आता ग्रामस्थांना मनस्ताप ठरत आहे. बिरेवाडीत त्या माकडाने बालके व ग्रामस्थांना चावा घेत जखमी केले होते. त्यानंतर त्या माकडाने आपला मोर्चा साकूरकडे वळवत दहशत निर्माण केली आहे. तसेच काही ग्रामस्थांना चावा घेत जखमी केले आहे.

सदर माकड अचानकपणे कुणावरही हल्ले करत आहे. ग्रामस्थ माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात पण ते अंगावर धावून येत असल्याचा प्रकार होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या माकडाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com