साकूर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे हल्ले होत आहे.

काही दिवसांपूर्वी बिरेवाडी येथे सागर मळ्यात भाऊसाहेब गणपत सागर यांची गाय बिबट्याने हल्ला करून ठार केली तर मांडवे शिंदोडी कौठेमलकापूर आदी ठिकाणी बिबट्याने हल्ले केले आहेत यात अनेकांच्या मेंढ्या शेळ्या कुत्री बिबट्याने फस्त केल्या आहेत.

दिवसेंदिवस साकूर पठार भागात बिबट्यांची दहशत वाढत आहे. पठार भागात जवळपास 15 ते 16 बिबट्यांची संख्या असल्याचे समजते. हे बिबटे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दबा धरून हल्ला करत आहेत. काही ठिकाणी तर दिवसा ढवळ्या बिबटे वावरताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पठार भागात सर्वच ठिकाणी पाणी व हिरवाई झाली आहे.

त्यामुळे बिबट्यांना थांबण्यासाठी परिसरात चांगले निसर्गरम्य वातावरण झाले आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे तर शेतकर्यांना रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी भरण्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री वीज असल्याने पिकांना पाणी भरण्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याने शेतकरी हे रात्री घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत.

बिबट्याचे हल्ले होत असून यासंदर्भात वनखात्याच्या कर्मचार्यांना कळविण्यात आले होते. वनखात्याने पिंजरा लावण्याचे प्रयत्न केले पण बिबटे पिंजर्यात अडकले नाही तरी वनविभागाच्या खात्याने बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी पठार भागातील अनेक नागरिकांनी केली आहे.