‘साकळाई’ साठी मोठा निधी देणार

ना. विखे यांचे आश्वासन || नगर तालुक्याच्यावतीने सत्कार
‘साकळाई’ साठी मोठा निधी देणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या माध्यमातून नगर, श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजना मंजुरीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

‘साकळाई’ साठी मोठा निधी देणार
पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोर्‍याकडे वळवण्यास प्राधान्य

नगर तालुक्याच्या अनेक गावांसाठी वरदान ठरणारी बुर्‍हाणनगर पाणी पुरवठा योजनेच्या 195 कोटींच्या योजनेचे अनावरण व विखे पाटील यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा वाळुंज (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आ. प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खा. सुजय विखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, प्रतिभा बबनराव पाचपुते, अक्षय कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. ना. विखे पाटील म्हणाले,‘राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. अनेक योजना येथून पुढच्या काळात मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे, असे ते म्हणाले.

‘साकळाई’ साठी मोठा निधी देणार
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अभिनेत्रीची साईदरबारी हजेरी!

राष्ट्रीय वयोश्री योजनेची माहिती खा. विखे पाटील यांनी दिली, आ. प्रा. शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील निधी ग्रामीण भागाच्या विकासाकरिता योग्य पद्धतीने वापरला पाहिजे यावर लक्ष वेधले, माजी मंत्री कर्डीले यांनी तालुक्यात मोठा विकास सरकारच्या माध्यमातून करण्याची मागणी केली, साकळाई योजनेचा विषय कर्डिले यांनीच लावून धरला आणि सर्वांनी याचे समर्थन केले, वयोश्री योजनेंतर्गत वृध्द व्यक्तींना चेअर सायकलींचे वाटप करण्यात आले.

उद्योग वाढीसाठी समन्वय राखा

पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडतानाच स्टार्टअप योजनेतून नवउद्योजकांना संधी निर्माण करुन दिली. औद्योगिक वसाहतीचा विकास करताना औद्योगिक शांतताही महत्वाची आहे. उद्योजक आणि कामगार यांच्यात योग्य समन्वय राहील्यास औद्योगिक विकासाला गती प्राप्त होईल. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मधील काही काळात निर्माण झालेल्या वातावरणामुळे येथून उद्योजक बाहेर गेले. मात्र आता पुन्हा एकदा उद्योजक नगरकडे कसे आकर्षीत होतील, असे वातावरण निर्माण करावे लागेेल. पारंपरीक उद्योगांमध्ये बदलांचे परिणाम येथे होत आहेत. त्यामुळेच नगरचा बदलता चेहरा आपल्याला पुन्हा दाखवून देण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे लागतील, असे मत ना. विखे पाटील यांनी व्यक्त केले. नगर येथील औद्योगिक वसाहतीतील निटवाईंड या उद्योग समुहातील कार्यक्रमात ते बोलत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com