
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड तालुक्यातील साकत येथील कडभनवाडी शिवारत बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजाता लागलेल्या आगीत 4 एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी प्रयत्न केल्याने आग दुपारी 3 वाजत आटोक्यात आली. त्यामुळे मोठी हानी टळली.
येथील शाहदेव मारुती कडभणे, मच्छीद्र मारुती कडभणे, अरुण पाराजी नेमाने, जालिंदर भाऊसाहेब नेमाने, या शेतकर्यांचा आगीत ऊस जळून नुकसान झाले. ग्रामपंचायत सदस्य सचिन नेमाने, बाळू नेमाने, प्रशांत बेद्रे, सचिन नेमाने, पवन कदम, रमेश नेमाने, बाबासाहेब कडभणे, रवींद्र नेमाने, नाना नेमाने, नितीन नेमाने, दत्त वराट, विकास नेमाने, माऊली कदम, रामभाऊ वराट, सुनीता कडभाणे, लताबाई कडभाणे या महिलांनीही आपापल्या परीने आगविझविण्यासाठी परिश्रम घेतले.
आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचे शेतकरी सांगतात सहयक अभियंता हिरामन गावीत यांना कळल्यानंतर वायरमन फाळके यांनी घटना स्थळाला भेट देऊन शेतकर्यांशी चर्चा केली.