‘सैराट’चा ‘प्रिन्स’ राहुरी पोलिसांच्या रडारवर

नोकरीच्या अमिषाने भेंड्याच्या तरुणाची फसवणूक प्रकरण
‘सैराट’चा ‘प्रिन्स’ राहुरी पोलिसांच्या रडारवर

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

मंत्रालयात नोकरीला लावून देतो, असे अमिष दाखवून नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा बुद्रुक (Bhenda Budruk) येथील एका तरूणाची पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्याची घटना 8 सप्टेंबर रोजी विद्यापीठ (Rahuri University) परिसरात घडली होती. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यात सैराट (Sairat) चित्रपटातील सुरज पवार (Suraj Pawar) ऊर्फ प्रिन्स (Prince) हा राहुरी पोलिसांच्या (Rahuri Police) रडावर आहे. दरम्यान आरोपींच्या जबाबात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या नावाचा संदर्भ आल्याने फोनवर त्यांच्या नावाने बोलणारा ‘तो’ नागराज कोण याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

‘सैराट’चा ‘प्रिन्स’ राहुरी पोलिसांच्या रडारवर
प्रवरा नदीत 11000 क्युसेकने विसर्ग

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा बुद्रुक (Bhenda Burduk) येथील महेश बाळकृष्ण वाघडकर (वय 25) या तरूणा बरोबर संबंधित फसवणूक (Fraud) करणार्‍या इसमाने ओळख करून घेतली होती. त्यावेळी त्याने मुंबई (Mumbai) येथे मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस आहे असे सांगितले होते. तसेच वारंवार बोलबच्चन करून त्या भामट्याने महेश वाघडकरला आमच्याकडे रिक्त पदासाठी जागा सोडतात असे सांगून त्या पदावर मी तुझे काम करतो. त्यासाठी पाच लाख रुपये भरावे लागतील असे नोकरीचे आमिष (Job Lure) दाखवले. सुरूवातीला दोन लाख रुपये घेतले आणि नियुक्तीपत्र आल्यावर तीन लाख रुपये द्यावे लागतील. असा व्यवहार ठरला.

‘सैराट’चा ‘प्रिन्स’ राहुरी पोलिसांच्या रडारवर
नगर शहराला हवेत दोन पोलीस उपअधीक्षक

दि. 8 सप्टेंबरला त्या भामट्याने महेशला फोन करुन तुझी ऑर्डर आली; पैसे घेऊन राहुरी विद्यापीठातील विश्रामगृहात येण्यास सांगितले. महेश वाघडकर याला संशय आल्याने तो राहुरी पोलीस ठाण्यात आला. आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सविस्तर माहिती दिली. दराडे यांच्या पथकाने विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस परिसरात सापळा लावून दत्तात्रय अरूण शिरसागर या भामट्यास ताब्यात घेतले. मात्र त्याचे साथीदार आकाश विष्णू शिंदे व इतर पसार झाले.

‘सैराट’चा ‘प्रिन्स’ राहुरी पोलिसांच्या रडारवर
संवत्सर शिवारात चाकुचा धाक दाखवत घरावर दरोडा

महेश बाळकृष्ण वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय शिरसागर (वय 31) रा. दत्तनगर, मालेगाव बसस्थानक व आकाश शिंदे (रा. संगमनेर) तसेच त्यांचे इतर साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील पसार आरोपी आकाश विष्णू शिंदे याला ताब्यात घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे मंत्रालयाचे बनावट शिक्के बनविणारा संगमनेर येथील ओमकार नंदकुमार तरटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मंत्रालयाचे बनावट शिक्के बनविण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजे सुरज पवार हा आला होता. त्याने सैराट चित्रपटाचे दिगदर्शक नागराज मंजूळे यांच्याशी बोलणे करून देतो, असे सांगून एका व्यक्तीला फोन लावून बोलणे करून दिले. ती व्यक्ती नागराज मंजुळे असल्याचे सांगून माझ्याशी बोलली. शिक्के हे कोणत्याही गैरवापराकरीता वापरणार नसल्याचे सांगून शिक्के बनवून द्या, असे त्याने सांगितले. अशी माहिती आरोपींनी दिली. पोलीस पथक आता सुरज पवार ऊर्फ प्रिन्स याच्या अटकेच्या आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com