संत निवृत्तीनाथांच्या पादुकांचे उद्या शिवशाहीने प्रस्थान
सार्वमत

संत निवृत्तीनाथांच्या पादुकांचे उद्या शिवशाहीने प्रस्थान

करोनामुळे निर्बंध, नगर जिल्ह्यातील हजारो वारकरी यंदा सोहळ्यास मुकले

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर जिल्ह्यातील वारकर्‍यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान मंगळवार दि. 30 जून रोजी होणार आहे. वारीत सामील होणार्‍या भाविकांची करोना चाचणी केल्यानंतर त्यांना शिवशाही बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी पालखीचे चल स्वरूपातील प्रस्थान होईल. तत्पूर्वी स्थानिक वारकर्‍यांच्या भक्तीसंगमानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे.

जिल्ह्यातील वारकरी मुकले - संत निवृत्ती महाराजांची पालखी त्र्यंबकेश्‍वर येथून निघून ती जिल्ह्यात प्रथम पारेगाव गडाख येथे येते. संगमनेरच्या तळेगावमार्गे,लोणी, बाभळेश्‍वर येथून श्रीरामपूर येऊन बेलापूरला मुक्काम असतो. त्यानंतर राहुरीत नंतर नगर, मिरजगावमार्गे पंढरपूरकडे रवाना होते. या दरम्यान नगर जिल्ह्यात या पालखीचे जोरदार स्वागत होते. तसेच अनेक वारकरी यात सहभागी होतात. पण यावेळी करोनामुळे निर्बंध आल्याने नगर जिल्ह्यातील हजारो वारकरी यंदा या सोहळ्यास मुकले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com