थकीत पगार न दिल्यास डफडे बजाव आंदोलन

साईनाथ शुगरच्या कर्मचार्‍यांचा इशारा : आठ महिन्यांपासून होतेय बोळवण
थकीत पगार न दिल्यास डफडे बजाव आंदोलन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) / Shrigonda - तालुक्यातील उक्कडगाव येथील साईनाथ शुगर प्रा.लि. कंपनीने (Sainath Sugar Private Limited Company) थकीत वेतन न दिल्यास डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी क्रांती सेनेच्या माध्यमातून तहसीलदारांना दिला आहे.

साईनाथ शुगर कंपनीतील कामगारांना नोव्हेंबरपासून पगार देण्यात आले नाहीत. त्यामुळे कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. करोना काळात कर्मचार्‍यांना पगार न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांच्यासह कर्मचार्‍यांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले. लवकरात लवकर पगार न झाल्यास कंपनीच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी डफले बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी सुभाष दरेकर, वैभव जाधव, अनिकेत सोनवणे, संजय पवार, साहेबराव लबडे, भरत मडके, अविनाश लगड, शरद मांडे, दीपक ढवळे, शिवाजी देशमुख, अनिल ढवळे, अक्षय भोंडवे, शिवाजी अडागळे, आशिष शेलार, संतोष भोस, सनी अडागळे, संजय शिनवरे, समीर सय्यद, भिवसेन मदने, अक्षय बडवे, जालिंदर कुदांडे, सयिस शेख, दत्तात्रय निंबाळकर, रमेश चौधरी, सुदाम सांगळे, उनवणे, रोहिदास लगड, दिलीप शेलार, गुलाबराव लोंढे, योगेश गोरणे, पवन आवताडे, अशोक रहाणे, दीपक साळवे, त्रिंबक साळवे, संजय लांडे, तुळशीराम अडागळे, संदीप ढवळे, प्रवीण म्हस्के आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com