
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीतील साईनगर रेल्वे स्थानकात वाढत असलेल्या रेल्वेच्या संख्येमुळे व वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यामुळे शिर्डीत येणार्या भक्तांचा ओघ वाढला आहे. परिणामी शिर्डी परिसरातील रिक्षा चालकांच्या कुटुंबांसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस मधून होणारा आरामदायी प्रवास विमान प्रवासाचा भास अत्याधुनिक असलेले तंत्रज्ञान व चांगल्या प्रकारच्या सुविधा व समाधानकारक असणारा अनुभव शिर्डीत येणार्या साईभक्तांना येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस व वाढत असणार्या साईनगर रेल्वे स्थानकावर रेल्वेची संख्या साईभक्त व प्रवाशांची गर्दी परिसराच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे.
साईभक्त प्रवाशांवर अवलंबून असलेल्या 450 अॅपे रिक्षा 350 मॅझिक चार चाकी वाहने, तीनशेच्या आसपास असणार्या पेट्रोल रिक्षा, दोन हजार बेरोजगार तरुणांच्या आयुष्यात स्थिरता येण्यासाठी होणारे हे परिवर्तन आहे. चालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फायदेशीर ठरणार असून त्याचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे यांना जाते, अशी प्रतिक्रिया चांगदेव जगताप यांनी व्यक्त केली.
जगताप म्हणाले, तरुणांना रोजगार नसल्यामुळे शिक्षण असूनही नोकरी उपलब्ध नसल्यामुळे तरुणांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीन चाकी, चार चाकी वाहने पतसंस्था, बँका, फायनान्स यांच्या माध्यमातून घेऊन साईभक्त भाविकांना सेवा देत रोजगाराची संधी उपलब्ध करून घेतली आहे. त्यांच्या अडचणी दूर करत त्यांना पाठबळ देण्यासाठी ना. विखे पाटील यांचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
यावर आमच्या चालक व मालकाचा विश्वास आहे. वाढत्या रेल्वे गाड्या लगतच्या काळात या रिक्षा चालकांच्या जीवनात स्थिरता व जीवनमान उंचावण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. रेल्वे प्रवाशी साईभक्त होणारी आर्थिक उलाढाल यामुळे रिक्षा चालकांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.