साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये प्रथमच 20 वर्षांनंतर महिलेची प्रसुती

साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये प्रथमच 20 वर्षांनंतर महिलेची प्रसुती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील साईबाबा सुपर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत येथे एकदाही महिलेची प्रसुती झालेली नाही. मात्र नुकतीच 20 वर्षानंतर प्रथमच श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका यांच्या प्रयत्नाने येथे एका महिलेची प्रसुती सुखरूपपणे करण्यात आली. त्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाल्याने या कन्या रत्नाचे येथे जिलेबी व पेढे वाटून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व उपस्थितांनी स्वागत केले. या कन्यारत्नाचे नाव वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष्मी असे ठेवले तर मुलीच्या परिवाराने तिचे नाव अतिथी असे ठेवले आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल असे दोन रुग्णालय असून श्री साईनाथ रुग्णालयात महिलांसाठी प्रसुती विभाग आहे. परंतु साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महिलांचा प्रसुती विभाग नसल्यामुळे या ठिकाणी प्रसुती केली जात नाही. परंतु 31 ऑगस्टला शिर्डीत अतिवृष्टी झाल्याने साईनाथ हॉस्पिटल परिसर पाण्यामध्ये गेल्याने काही दिवस साईनाथ रुग्णालय बंद असल्यामुळे यातील रुग्ण श्री साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अशा या रुग्णांपैकी एका महिलेची नैसर्गिक प्रसुती शिर्डीतील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये सुखरूपपणे दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. तांबे, डॉ. अशोक गावित्रे, डॉ. महेंद्र, डॉ. निर्मला गाडेकर, श्रीमती पठाण, सौ. दिवे. डॉ. भांगे आदींसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com