साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या सी. आर. यु. कक्षात युपीएसचा स्फोट

साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या सी. आर. यु. कक्षात युपीएसचा स्फोट

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सी.आर.यु. युनिटमध्ये अचानकपणे युपीएसचा स्फोट झाला. सुदैवाने या कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोणतीही इजा झाली नाही.

साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या सी. आर. यु. कक्षात युपीएसचा स्फोट
चक्क ! 40 रूपयांचा उद विकला एवढ्या हजार रूपयांना

संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुसर्‍या मजल्यावरील सी. आर. यु. या युनिटमध्ये अचानकपणे युपीएसचा स्फोट झाला. यावेळी कक्षात उपचार घेत असलेल्या हृदयविकार शस्त्रक्रिया संबंधित बायपास, अँंजिओप्लास्टी आदीचे 19 रुग्ण दाखल होते. स्फोटाच्या आवाजाने काही रुग्णांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःहून बाहेर पळ काढला. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने तातडीने या सर्व रुग्णांना दुसर्‍या कक्षात हलवून त्यांच्यावर उपचार केले. बँटरी ओव्हरचार्ज झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आलेे.

साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या सी. आर. यु. कक्षात युपीएसचा स्फोट
शिर्डीत हायअलर्ट

या घटनेनंतर साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, विश्वस्त सचिन कोते, विश्वस्त सुमित शेळके यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे यांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपसंचालक डॉ. प्रितम वाडगांवे, बांधकाम विभागाचे संजय जोरी, श्री. गायकवाड, विद्युत विभागाचे अधिकारी तसेच यासंदर्भातील विभागाच्या पदाधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या सी. आर. यु. कक्षात युपीएसचा स्फोट
साईभक्तांना ऑनलाईन फसवणुकीचा फटका

रुग्णालयात रुग्णांच्या जिवाला धोका होणार नाही यासाठी अद्ययावत मशिनरी, साधनसामग्री खरेदी करतांना टेंडर प्रक्रियेतून उत्तम दर्जेदार वस्तू खरेदी करायला हव्यो असे मत विश्वस्त सचिन कोते यांनी व्यक्त केले. ओव्हरचार्ज होऊन स्फोट झालेले युपीएस तेथून काढून त्याठिकाणी दुसरे युपीएस बसविण्यात आले आहे असे असले तरी नव्याने बसविण्यात आलेल्या युपीएसमध्ये पुन्हा ओव्हरचार्ज होऊन स्फोट होणार नाही हे कशावरून ?असा प्रश्न निर्माण झाला असून सदरची यंत्रणा या सी.आर.यु या कक्षातून तात्काळ हलविण्यात यावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घटना घडल्यानंतर मेडिकल टिमने तातडीने तेथील रुग्ण हलविण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. तांत्रिक बिघाड झाल्याने सदरची घटना घडली आहे. मात्र संबधीत जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापुढे अशाप्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

- भाग्यश्री बानायत, मुख्य कार्यकारी अधिकारी

संस्थानच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसोबत तातडीने बैठक घेऊन सदरच्या युपीएससाठी यंत्रणेसाठी सीआरयु युनीटच्या दरवाजाबाहेरील डकमध्ये स्वतंत्र जागा निवडण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारचे संभाव्य धोके निर्माण होणार नाही यासाठी साईसंस्थानच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डोअर क्लोज संदर्भात देखील अडचणी असल्याने त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्यादृष्टीने सुचना करण्यात आल्या आहेत.

- डॉ एकनाथ गोंदकर, विश्वस्त साईबाबा संस्थान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com